div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Monday, September 9, 2019

कविता सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज




सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज

हाथी माळ अन मुखी गातो राम नाम
सद्गुरू तुमचे होते क्षनो क्षनि ध्यान

केला प्रसार नामाचा अन केले अन्नदान
येता दारी तुमच्या मज मिळते समाधान

मुखी जाता प्रसाद आनंद मना मनात
गरीब अन श्रीमंत दुजाभाव नसे दारात

माणुसकी ची शिकवण रुजवि अंतर्मनात
विसर न व्हावा असा मंत्र देई कानात

अनन्य महत्व विभूतीचे माझ्या जीवनात
समाधानी झालो या असमाधानी जगात

नित्य घडो दर्शन अन नित्य घडो सेवा
असाच माझ्या मुखी ठेवा नामाचा मेवा

शिकवण तुमची भरो माझ्या चराचरात
कृपेचा वर्षाव हॊवो माझ्या घरा घरात

कोणते केले पुण्य आलो तुमच्या दारात
दर्शन होता तुमचे आनंद माझा गगनात

लाभली साथ तुमची हे तर भाग्य आमचे
दर्शन घेऊन धन्य झालो ब्रम्हचैतन्य महाराजांचे
                                        © रोहित जाधव
        Visit  page on fb      #काव्यप्रवाह