div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Saturday, November 30, 2019

लढ खुर्चीसाठी.... !!! कविता

लढ खुर्चीसाठी.... !!!

कुणी बोलतं सत्ता आली
कुणी बोललं सत्ता गेली
तुमच्या सत्तेच्या पायी
आई शेतकऱ्याची मेली.

सत्ता येता कोण करतो माज
तर कोण चढवतो आवाज
तुमच्या माजात अन आवाजात
माझा शेतकरी मरतो कर्जात.

आज जरी असतील इकडे
उद्या दिसतील तिकडे
कसा बसवतील विचारांचा मेळ?
कारण,पक्षांतर आहे एक खेळ.

कधी वाटतं का करावं मतदान
तर कधी वाटतं का द्यावं निवडून
कारण आपलेच देशात आणतात
भ्रष्टाचार अन दंगली घडवून.

आज आहे याच सरकार 
उद्या येईल त्याच सरकार
तुमच्या आमच्या सरकारात
असे किती दिवस होतील बलात्कार ????
तर कधी थांबतील स्त्रियांवरचे अत्याचार ????
                          ©रोहित जाधव(R.J)
Visit #काव्यप्रवाह page on fb.

Thursday, November 28, 2019

सावध हो रे सावध हो.... कविता

सावध हो रे  सावध हो...


सावध हो रे  सावध हो
माझ्या मित्रा सावध हो..
प्रेमापासून थोडा
लांबच हो...लांबच हो..
दिवस होते कॉलेजचे प्रेमात
बहरून पाडण्याचे....
काळी गोरी अ्न शेंबडी पोर
आवडायची मला खरोखर
मेकअप चालायचा तिचा सर्वांसमोर...

भुललो ना भाऊ तिच्या मेकअपला...
डायरेक्ट नडलो तिच्या बॉयफ्रेंड ला
झाली ओवरेक्टींग माझी थोर
पडली माझ्या गळ्यात ती पोर
खालती वरती काहीच सुचेना
 रातभर ती पोर मले झोपूच देइना.

चांगलाच वाढला आमच्या प्रेमाचा स्कोर
 मॅथ अ्न इंग्लिश वाटू लागले बोर..
मधूनच जायचो हॉटेलला पाव भाजी
अण आइस्क्रीम चाटायला...
बिलाचे पैसे माझ्या वाट्याला
नसलेच तर सांगायचो टिपायला.

गाडीवरचे नखरे काय सांगू तुला
हात सोडून गाडी चालव म्हणे मला
कॉन्फिडन्स गेला माझा शिगेला
डायरेक्ट हात घातला तिच्या चॅलेंजला..

तिला उभे केले एका बाजूला
दोन्ही हात माझे झाले साईडला
उताना पडलो  रस्त्याच्या कडेला
पोर गेली टमटमने आपल्या घरला
पण बापाने मला चहूबाजूंनी घेरला.

मी म्हणे तिला तु हे बरं नाही केलं
एकट्याला सोडून तू घर जवळ केल..
ती म्हणे तुला ॲक्शन नाही जमत
हात सोडून गाडी तुला नाही जुळत.

भांडणात आमचं ब्रेक-अप झालं
मोडक्या हाताच दुखणं माझ्या गळ्यात आलं
हॉटेलचे बिल देण नाही झालं .
भांडी घासण्याचं काम माझ्या नशिबी आल.

तिच्या भावाचं मला आमंत्रण आलं
धडधड काळीज घाबरून गेल...
ईचारात रात भर थंडीत मेलं
कुणास ठाऊक त्या कार्टीन...
घरी काय काय सांगितलं?

सकाळ सकाळ तिच्या दारात
लोटांगण घातल ...अ्न ओरडून सांगितलं
आपच प्रेम प्रकरण केव्हाच संपल..
केव्हाच संपल.....😢😢😢
सावध हो रे  सावध हो
 माझ्या मित्रा सावध हो....
प्रेमापासून थोडा
लांबच हो...लांबच हो..
               © रोहित जाधव (R.J)

Wednesday, November 20, 2019

स्वप्न .....कविता

       स्वप्न .....
तुटलेल्या स्वप्नांना आस होती
नव्याने पुन्हा पडण्याची..।
कारणे कळत नव्हती काहीच
डोळ्यात खारे पाणी वाढण्याची.

मधुर स्वप्नांच्या त्या राती..।।।
तुझा हात होता माझ्या हाती
डोळेच सारा भाव ओळखती
प्रिये जेव्हा तू एकटक पाहती.

दडपण नसे स्वप्न पाहण्याला
अंकुश नव्हते माझ्या मनाला..
वागणेच चुकले असेल काही
का दोष देऊ स्वप्नाच्या जगाला.

मोकळे करू तू पाहत होती
त्या अंधारातल्या बंद खोलीला
तू सूर्याचा एक किरण आहेस
उजेड देती अंधाऱ्या रातीला.

दिसते तु अशी जसे इवलेशे बीज
पाहतो तुझ्यात लखलखती वीज
तुझ्यात भासते मज वर्षाची लहर
रुपात तुझ्या पडे पावसाची सर.

नकोस तोडू तू माझ्या स्वप्नांना
रोकेल मी या पहाटेच्या क्षणाला
आहेस तू जवळ देई मज इशारा
धावणारे ढग अ्न सावरणारा वारा..।
                ©रोहित जाधव (R.J)

Sunday, November 17, 2019

सुविचार

सुविचार:-
घराची श्रीमंती ही घराच्या आकारावरून नाही तर घरातील लोकांचेआरोग्य,सुख,आणि समाधान या वरून ठरते.
                 ©रोहित जाधव.

Thursday, November 14, 2019

पती-पत्नी



   पती-पत्नी

ओळख नव्हती कधी
ना पहिले एकमेका आधी
नाते जुळून आले
लग्नाचे मुहर्त पहिले.

घेऊन झाल्या सात फेऱ्या
मंगलाष्टका झाली
सर्वांचा आशीर्वाद घेऊनी  
नवरी नवऱ्या घरी निघाली .

मना मध्ये विचार आला 
पती-पत्नी म्हणतात कोणाला....?
सुख दुःखात सदा सोबती
तेच पवित्र नाते पती-पत्नी
सात जन्माचा सोबती
तेच पवित्र नाते पती-पत्नी .

पती-पत्नी प्रेमाचा एक संगम
नव्या जीवाचा एक उगम
अतुट विश्वासाचे बंधन 
करी संसाराचे नंदन. 
                                ©रोहित  जाधव .
         Visit- काव्यप्रवाह page on fb.

Wednesday, November 6, 2019

कविता # प्यार...

   प्यार...

तुम मुझे छोड के कही और जाये...
वो दिन देखना मुश्कील हो जाये।
रखुंगा पैरो में तेरे वो खुशीया....
कि तेरा साथ ना तूट    जाये।

रहेंगा अमर  ये प्यार अपना
बस्स हकीकत हो ना हो सपना
तेरे प्यार ने मुझे पागल बनाया
बनके पागल मैंने तुझें अपनाया

सारा जमाना  कहै की
दिल है  इक खिलौना
पर तुम ना समझना....
मर भी गया तो बस्स
तुम ना भुलना...तुम ना भुलना

                    ©रोहित जाधव (R.J)

Tuesday, October 22, 2019

कविता #ओळखी चे घर ..

# ओळखी चे घर ..

ओळखी चे घर माझे
आज दूर झाले
दाटलेल्या आभाळागत
मन माझे भरून आले
सख्खे नाते ते माझे 
आज पोरके झाले.


वाट होती काट्याची पण
आपुलकी आणि प्रेमाची
माणसे होती भोळी पण 
श्रद्धाळू आणी स्नेहाची
घरे आहेत साधी पण 
शक्ती आणि भक्तीची
तेच घर आडोशाला गेले
ओळखी चे घर माझे
आज दूर झाले.

बिथरलेल्या डोळ्यांनी....
वर पाहता पाहता.....
पाटाचे पाणी स्थिर झाले
हिरवेगार शिवार ते ही 
आता दिसेनासे झाले..

निरोप घेता  हृदय माझे 
भरून आले....
दाटलेले अश्रू आज 
मोकळे झाले
हसऱ्या चेहऱ्याचे आज
रूप वेगळेच झाले
ओळखी चे घर माझे
आज दूर झाले

डोळ्यातील अश्रू आता 
गाला वरती आले
हुदंक्याने माझ्या सर्वच 
गहिवरून गेले
निरोप देता घराला 
आठवणीचे ओझे खांद्यावर आले...
ओळखी चे घर माझे
आज दूर झाले.....आज दूर झाले..।

                   © रोहित जाधव (R.J)
                Visit  काव्यप्रवाह page on fb.

Friday, October 4, 2019

अनमोल जीवन

     अनमोल जीवन

जीवन अमूल्य आहे . त्याचे मोल समजून आयुष्य जगले पाहिजे .मृत्यूच्या दारात एक दिवस सर्वाना जाणे आहे.परंतु एखाद्या शुल्लक कारणास्तव वेळेच्या
आधी स्वतःचे फक्त जीवन संपवून नाही तर ही अद्वितीय सृष्टी ,स्वर्गालाही लाजवणार निसर्ग, देवापेक्षा हि श्रेष्ठ असे आई -वडिलांचे प्रेम सोडून जाणे कितपत योग्य आहे.
कितीही पैसे दिले तरी हा जन्म पुन्हा नाही.
एखादया प्राण्याने आत्महत्या केली असं आजून तर घडले नाही.ते सुद्धा स्वतःच आयुष्य आनंदाने आणि आलेल्या कठीण वेळेत  समाधानी राहून जगतात.
     मग ही वेळ पृथ्वीवरील सर्वात हुशार अन आपल्या जोगे स्वरूप विश्व निर्माण करणारी मानव-जात त्याच्यावरच का येते?
       कारण स्पर्धेच्या युगात माणूस आपले अस्तित्व विसरून गेला आहे.तो माझ्या पुढे गेला, मग मीच का मागे?सर्व हुशार, मग मीच का 'ढं'? सर्व श्रीमंत, मग मीच का गरीब?मीच का कर्जबाजारी?का मीच हरतो सतत?माझ्याच वाट्याला का दुःख?मी कधी होणार त्याच्या एवढा श्रीमंत?आणि त्याच्या सारख मी कधी जगणार आयशो-आरामात?
    याच विचारात जगणे आणि सतत स्वतःची दुसऱ्याबरोबर  केलेली तुलना आणि त्यातून आलेले नैराश्य हेच मूळ कारण आहे स्वतःला संपवून घेण्याचं.
 कशासाठी आपण आपले जीवन आणि आपले नशिब तोलत राहतो दुसऱ्याशी ?
    त्याच्या पुढे जाण्यासाठी कि अपयश आल्यास आत्महत्या करून सर्वांच्या पुढे जाण्यासाठी.
 स्वतःतील अहंकार ,प्रामाणिक पणा, अन स्वतःतील चुकांची स्वतःशी तुलना करा.मान अपमान सोडून स्वतःच्या कुवती प्रमाणेच कष्ट ,प्रयत्न व निर्णय घ्या.कारण आपण आहोत तरच सर्व आहेत.आपल्यापेक्षा काहीच मोठे नाही या जगात.
आणि शेवटी सरते सांगायचे झाल्यास,अपयश,हार,जीत  हे जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. ते जीवनात येणारच.

नाही तर बिना संकटांचे आळणी आयुष्य जगण्यात काय मजा...!☺️☺️

                                       © रोहित जाधव.
                    Visit  page on fb.   #काव्यप्रवाह

Monday, September 9, 2019

कविता सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज




सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज

हाथी माळ अन मुखी गातो राम नाम
सद्गुरू तुमचे होते क्षनो क्षनि ध्यान

केला प्रसार नामाचा अन केले अन्नदान
येता दारी तुमच्या मज मिळते समाधान

मुखी जाता प्रसाद आनंद मना मनात
गरीब अन श्रीमंत दुजाभाव नसे दारात

माणुसकी ची शिकवण रुजवि अंतर्मनात
विसर न व्हावा असा मंत्र देई कानात

अनन्य महत्व विभूतीचे माझ्या जीवनात
समाधानी झालो या असमाधानी जगात

नित्य घडो दर्शन अन नित्य घडो सेवा
असाच माझ्या मुखी ठेवा नामाचा मेवा

शिकवण तुमची भरो माझ्या चराचरात
कृपेचा वर्षाव हॊवो माझ्या घरा घरात

कोणते केले पुण्य आलो तुमच्या दारात
दर्शन होता तुमचे आनंद माझा गगनात

लाभली साथ तुमची हे तर भाग्य आमचे
दर्शन घेऊन धन्य झालो ब्रम्हचैतन्य महाराजांचे
                                        © रोहित जाधव
        Visit  page on fb      #काव्यप्रवाह




Tuesday, August 27, 2019

कविता....डोळ्यासमोर सगळ घडले.!

          डोळ्यासमोर सगळ घडले....

भ्रष्टाचाराच्या नादात सरकार कोनाच पडलं...
मोदिच्या लाटेन आकाशच भिडलं..
आश्वासनाच्या दुनियेत 
कंबरडे शेतकऱ्याच मोडलं
पन डोळ्यासमोर सगळ घडलं..

डिजीटल च्या दुनियेत इंटरनेट परवडल.
पेट्रोल मात्र गगणाला भिडल...
म्हने कर्ज माफीच गणित आम्हीच सोडवल....
खरे पाहता किती पैस हाथात पडले??
पण् डोळ्यासमोर सगळ घडले....


कालच आई बोलनार नात मम्मी मध्ये
Convert झाल...
साडी ची जागा जिन्स ने घेतल्यावर...
संस्कार नावाच बिजच गायब झाल
पन डोळ्यासमोर सगळ घडलं...
 डोळ्यासमोर सगळ घडलं..

वाटले आता काही नवलच घडले पण
स्टाईल च्या नावाखाली सर्वच मोकळे पडले...
आर्ध्यी कपडे घालून कुठे शहानपण वाडले...
पन डोळ्यासमोर सगळ घडले

समजलं मला पुढे गेला जमाना...
पण् पुढे तर फक्त वय गेल.....

 Technologyदुनियेत वातावरन 
आपलच Tight झाल...अ्न
 धावपळीच्या च्या नादात 
१०० च जगन ६० वर आल...
पन डोळ्यासमोर सगळ घडलं..
पन डोळ्यासमोर सगळ ....घडलं

               ©   रोहित जाधव (R.J)
            #काव्यप्रवाह

Saturday, August 10, 2019

महापूर....कविता

  • Visit  #काव्यप्रवाह on fb.                                                                                                                                                                                                                                                                      महापूर

अर्धी स्वप्ने गेली पुरात वाहून 
मग पुसल्या साऱ्या वाटा
जगणे माझे वाचले पण 
 वाचला का गाईचा गोटा ?

उगड्या डोळयांनी पाहून 
डोळे माझे भिरभिरले
वाहता संसार पाहून 
उजेडात तारे दिसले.

तुटलेल्या स्वप्नात आता 
गीत कोणते गावे
अंधाराला गिळले तरी
पोट उपाशीच निजावे.

नुसतीच लुडबुड करीत
आले पक्ष्यांचे थवे
मदतीचे देखावे नुसते उभे
दहा माणसे उपाशी अन
हाथी 2 सरकारी डबे.

  भिऊन तुला आजचा (पुरास आव्हान केले आहे)
एक दिवस दूर जाऊ
जाता जाता पडक्या 
भिंती निरखून पाहू.

गवसणी घालाय माय 
भूमीवर नक्कीच येऊ
चिखलात पडलेल्या भिंती 
पाशी अलगत जाऊ .

अन तुटलेल्या छताखाली
पण राहू
वाहून गेलेल्या काळ्या 
आईस निरखून पाहू.

नुसते पाहून नाही थांबणार
गात गाऱ्हाणे मागचे 
नाही रडणार.
नव्याने नवजीवन जगण्यासाठी ,
मी.....
पुन्हा पुन्हा लढणार ...मी....पुन्हा पुन्हा लढणार 

                             ©    रोहित जाधव(R.J)
                     Visit      #काव्यप्रवाह on fb.


Sunday, August 4, 2019

असावं कि नसावं...।

For more visit
👇👇👇
https://poemrj7.blogspot.com
                                                                   असावं कि नसावं...।

जीवनात हक्काच......
कुणी तरी कधी असावं💑
अन कुणी तरी असून हि नसावे....
असावे कि नसावे.....???
या कोडयाचे द्वंद्व सोडवलेच तर....
उत्तर.........
जीवनात हक्काच असाव.
पण आपल्याशी प्रामाणिक.....
आपल्या मागे    कडू हसून,
हळूच धोका देणारं आस,
हक्काचं असल तरी,
जीवनात कुठेच नसावं...
                    ©रोहित जाधव(R.J)
                       #काव्यप्रवाह

Thursday, August 1, 2019

धास्ती...!

Visit and like :-काव्यप्रवाह page on fb.
https://poemrj7.blogspot.com
                                                                                       धास्ती.....!

इवल्या जाहिरातींनी खूप घातली धास्ती
विज्ञानाच्या युगात शिकलेले च फसती
धुतला नाही हाथ तर किटाणू पोट खाती
अधीन झालो लागून जाहिरातीच्या नादी

अस्सल श्रीमंत लोक काय त्यांना कमी
वैद्य सांगी रोज त्यास चारा अन पाणी
एवढा पैसे असून तरी कुठे कमी पडले
रोज check up पण किती आयुष्य वाडले

होत नसे साखर खाल्ला ऊस मुळा सकट
आला जरी ताप तर औषध होत फुकट
कुठे पडले दात घासले नाही कोलगेट
डेंटिस्ट कड जायला बाप नव्हता बिलगेट

पुर्वी चा काळ खूप होता चांगला
साधी च झोपडी कुठे होता बंगला
कुठे होते RO शुद्ध करण्या पाणी
नसे tension कारण गोड होती वाणी


लावला कोणता जरी साबण 
वाढते वय लपते का
फसव्या साऱ्या जाहिराती
पहा तुम्हाला पटते का....
                          © रोहित जाधव(R.J)

Tuesday, July 23, 2019

कविता.....तुझ्या विना.....।

Visit काव्यप्रवाह page on fb.                   https://poemrj7.blogspot.com.                                   Rohit jadhav(R.J)                                                                                                                                                                                    तुझ्या विना.....

तुझ्या विना न माझे कोणी 
अस्तित्व काय एकट्याचे
सारे सुख तुझ्याच पायी
साथ तुझिच मागतो आई 

काय आहे माझं एकट्याच
काय कमावलं मी एकट्यान
तुडवून तू काट्याचे फास
जगवले मला तू एकटीने

सहन केला किती तू त्रास
मज साठी केले तू उपवास
जन्म दिला झालो मी धन्य
तुझी सेवा हेच माझे पुण्य

आठवण तुझी येते क्षणोक्षणी
 रूप तूझे प्रिय मज चंद्राहुनी
स्वार्थी नाते लोभी दुनिया सारी
मायेच्या दुनियेत तूच जननी खरी 

तुझ्या विना जगणे जणू भिकारी
तुझ्या विना प्रेम न देई कोणी
तुझ्या विना आधार कोठे नाही
तुझ्या विना आयुष्य दिव्यांगा वानी

नको देवा मला अन्य काही
राहू दे माझ्या साथ आई 
मस्तक माझे तिच्याच ठायी
उपकार तुझे न फिटणारे आई......।।।

                                         रोहित जाधव(R. J)
                                        #काव्यप्रवाह

Monday, July 22, 2019

लेख राग...!

https://poemrj7.blogspot.com.                  Follow काव्यप्रवाह page on fb.                                         Rohit jadhav(R.J)                                                                                                                                        
                                           
                          राग.....।।।


किती लहान शब्द आहे ना ,पण जर त्याने रुद्र रूप धारण केले किंवा तो शिगेला पोहचला मर्यादेच्या पलीकडे तर किती गोष्टी बिघडतात,किती मने तुटतात काहीच्या काही बोलून किंवा कृत्य करून जातो आपण तेवढया एका,अविचारी क्षणात आणि तोच क्षण मग करून जातो आयुष्याचा खेळ खंडोबा मग पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही आयुष्यभर.
    जगात अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही की त्याला राग येत नाही किंवा आलेला नाही.एखादया खटकणाऱ्या गोष्टीवरून राग येणे हे स्वाभाविक आहे आणि तो आला हि पाहिजे कारण प्रेमळ स्वभावाचा हि काही जण फायदा घेऊन त्रास देतात.तुम्ही मुंगीला डीवचा तीला हि राग येईल.
      राग आतल्या आत गिळून मनाचा कोंडमारा करणे हे देखील चुकीचे आहे तो व्यक्त हि केला पाहिजे मर्यादेच्या सीमेत राहून त्याचा अतिरेक किंवा रागाचे रूपांतर वैर व सूड भावनेत करून स्वतःच्या आयुष्याची वाट लावण्यात कोणते तथ्य आहे .
           राग न येणे हे जरी अशक्य असले तरी त्यावर समुपदेशाने नियंत्रण करून परिस्थिती हाथाळने हे आपल्या हाथात आहे.
         अपवाद वगळता आपण राग हा नेहमी  आपले सर्व ऐकून घेणाऱ्या अथवाआपल्या खालच्या दर्जाच्या व्यक्तीवर व्यक्त करत असतो.
उदाहरणच सांगायचे झाल्यास, आपल्या दारात कुत्रे आले तर आपण त्याला रागाच्या भरात दगड मारून पळवून लावतो पण जर वाघ आला तर राग येणे सोडा स्वतःचा जीव मुठीत धरून तिथून निघून जातो.
     स्वामी विवेकानंद म्हणतात, राग येणे म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहणे...
        रागाच्या भरात स्वतःला संपवण्यापेक्षा प्रेमाने, आपुलकीने, आणि हसत जग जिंकता येते का द्वेषाने किंवा सूड भावनेने जग जिंकता येते ....  हे तुम्हिच ठरवा....!!
                                 ©    रोहित जाधव(R.J)
                                            #काव्यप्रवाह

Friday, July 19, 2019

#बाबा....!

Follow काव्यप्रवाह page on fb.
https://poemrj7.blogspot.com
                          Rohit jadhav(R.J)


                                                          

#बाबा....!

 #बाबा.....!
श्वास दाटले माझे त्या गर्भात
नकोस आडवू येने माझे या जगात
दाटले अश्रू माझे आतल्या आत
माझ्याच वाट्याला का येतो गर्भपात?
कोनते घडले ते माझ्या हातुन पाप?

 #बाबा.....!
आई ,बहिन ,बायको तुम्हास लागे
मग कोमल कन्येस का तु त्यागे?
ठेव भरवसा माझ्या त्या मनगटावर
का रोखतो मला तु अर्ध्या वाटेवर?
जन्माआधीच मरणे नको माझ्या माथ्यावर ..

  #बाबा.....!
निखळ स्वप्ने माझी नाही काही वाईट
कधि कधि समाजाचा येई मज इट 
न्याहाळु दे मज या दुनियेची रीत
धावशील ना तु माझ्या या लडाईत?

#बाबा.....!
अर्ध्ये जगने असेल तुझ्या पाशी
अर्ध्ये सोपवले दुसर्याच्या हाथी
काय लिहले ते माझ्या माथी???
 कसा असेल तो जिवन साथी?.

#बाबा.....!
पाहीजे घरा-घरात मायेची लेक
जुळे नात्यास नात्ये घाली सांगड सुरेख
काहिच मागने नाही..काहिच मागने नाही
 निच्छितं राहीन मी आईच्या पदरात 
नकोस फुंकर मारु आमच्या नात्यात 
देईन  मी तुझीच साथ संकटात 
             नकोस फुंकर मारु आमच्या नात्यात.

                                   ©  रोहित जाधव(R. J)
                                  #काव्यप्रवाह







Monday, July 15, 2019

।।श्री सद् गुरु ब्रह्मचैतन्य महाराज।।

For more followकाव्यप्रवाह page on fb.
https://poemrj7.blogspot.com
                       Rohit Jadhav(R.J)
                                                                                                                                                                                                                                                                                                            ।।श्री सद् गुरु ब्रह्मचैतन्य महाराज।।

सद् गुरु अर्पण करतो माझे चित्त तुमच्या ठायी
असेच तुमचे नाव माझ्या सदैव मुखी राही

कधी गर्व,कधी अहंकार तू न देई मज अंगी
नामा मध्ये आहे समाधान हे तू जगा सांगि

नाम ज्यांच्या मुखी सदैव तू त्यांच्या पाठीशी
नामा मध्ये दंग होऊनी दुःख हे सर्व विसरती

करीतो आम्ही अन्नदान अन् सगुण भक्ती
नामस्मरणा ची साथ हिच आमची शक्ती

सद् गुरु तुम्ही भेटला भाग्य आम्ही मानतो
न व्हावा विसर म्हणून राम नाम मुखी गातो

।।श्री राम जय राम जय जय राम।।
                                     ©रोहित जाधव(R.J)
                                      #काव्यप्रवाह

Sunday, July 7, 2019

कविता ....'राजकारण'...।।।

https://poemrj7.blogspot.com.                                     Rohit Jadhav(R.J)
                                                                                                                                                                                                                                               राजकारण..।।।


राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे
पक्षा -पक्षांना नसे कोणाचे घेणे देणे
आपलेच नाते वर काढीत नेणे
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे

तुमच्या आमच्या हातात झेंडे देणे
निरागसतेने जाती -जाती चे युद्ध पाहणे
खुर्चीच्या खेळासाठी डाव सारा चाले
सत्तेच्या धुदिंत आम्हा विसरतात साले....
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे

कोटी कोटी च्या पैशावर लोळीत गेले..
आपल्या घरात आमदार खासदार किती झाले?
शेतकऱ्यांच्या जीवावर निवडणूक चाले
गरिबासाठी लढता-लढता स्वतः मोठे झाले
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे

मी लिहतो म्हणजे वास्तव सांगत आहे...
तुटलेल्या पंखांना बळ देतो आहे...
मी कणकण जोडीत जातो जे सत्य आहे..
मी लाथाळून देतो जे असत्य आहे..।।।।।।

                          ©रोहित जाधव (R.J)
                         (काव्यप्रवाह.)


Thursday, July 4, 2019

कविता..व्यस्त...!!!

https://poemrj7.blogspot.com               
                           Rohit Jadhav(R.J).                               
                       व्यस्त...!!!

खरं आहोत का आपण व्यस्त?
हातात मोबाईल एकदम मस्त
गाव विसरला भाचा मामाच
सवय लागली बीजी जगायच

क्लास मध्ये हरवले बालपन
मोबाइलन वाया गेल तरुणपण
युट्युब वर टाईमपास झाला इजी
ओरडू राहिले आमी खूप बीझी

समजलं दुनिया झाली फास्ट
ऑफिस च वाटू लागले बेस्ट
कुटुंबासाठी वेळ एकदम वेस्ट
व्यायाम नाही कर बीपी,शुगर टेस्ट

काम कमी नखरे झाले थोर
हाथी मोबाईल कडेवर पोर
अलार्म ची वाजु लागली बेल
सिरीयल पायी झाला होता वेळ

फोन त्याचा आला तरच करेन
फ्री क्वालिंग पण बिल फुकट भरेन
मोबाईल जरी झाले असले  स्वस्त
काय उपयोग माणसं झाली व्यस्त....।।।
   ©रोहित जाधव (R.J)
         (काव्यप्रवाह.)
                              


Wednesday, July 3, 2019

कविता... एकटा....!!!

  https://poemrj7.blogspot.com 
                                    रोहित जाधव (R.J)
                        
                           
                          एकटा....!!!            

बसलो एकटा की 
आठवन तुझी येते....
 साथ सोडून तु अशी
 दुर का जाते???

 विचारांचे वादळ माझ्या
 मनात घोगांळते...
 कधी येते परत 
आठवन तुझी येते.

 तुझ्या प्रेमाचे प्रतिक 
माझ्या काळजात राहते...
पुन्हा कधी भेटशील 
 इच्छा मनात राहते....

सोडुनी आरध्यावर मला,
तु अशी दुर का जाते???
बळजबरी केले लग्न , 
तरी प्रेम हे प्रेमच राहते.....

हृदयाचे नाते तु या 
समाजाला का सांगते???
याच्यशी लडल्यावरच प्रेम .....!!
आमरण राहते..!!!
        प्रेम आमरण राहते.......

बसलो एकटा की 
आठवन तुझी येते....
साथ सोडून तु अशी 
दुर का जाते???
                                                
                 © रोहित जाधव (R.J)
                           (काव्यप्रवाह.)

Tuesday, July 2, 2019

कविता..... शाळेचा पहिला दिवस..।।


https://poemrj7.blogspot.com
                         Rohit Jadhav(R.J)
                
                
                            
                    
                 शाळेचा पहिला दिवस...।।

आमच्या शाळेची बेल वाजली
शांत शाळा आता बोलू लागली
सुरु झाल्या सुट्टीतल्या गमती
सगळा परिसर दुमदुमती

डोळे मिटले आता प्रार्थना करू
पसायदान झाले झाला तास सुरु
स्वच्छ भरला होता आमचा वर्ग
नवीन आसन म्हणजे एक स्वर्ग

होता दिवस पहिला शाळेचा
मौज,मजा,मस्ती अन खेळाचा
होत होती घंटा अर्ध्या तासांनी
भूक लागली डब्याच्या वासानी

झाली सुट्टी वेळ जेवणाची
भूक लागली होती केव्हाची
आवडती भाजी गवारीची
मग वाटनी एकमेकांच्या डब्याची


धुतले हाथ डबा केला फस्त
दिवसभर खेळलो बिनदास्त
वेळ झाली शाळा सुटण्याची
इच्छा मनात उद्या भेटण्याची
                       राजकारण..।।।


राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे
पक्षा -पक्षांना नसे कोणाचे घेणे देणे
आपलेच नाते वर काढीत नेणे
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे

तुमच्या आमच्या हातात झेंडे देणे
निरागसतेने जाती -जाती चे युद्ध पाहणे
खुर्चीच्या खेळासाठी डाव सारा चाले
सत्तेच्या धुदिंत आम्हा विसरतात साले....
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे

कोटी कोटी च्या पैशावर लोळीत गेले..
आपल्या घरात आमदार खासदार किती झाले?
शेतकऱ्यांच्या जीवावर निवडणूक चाले
गरिबासाठी लढता-लढता स्वतः मोठे झाले
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे

मी लिहतो म्हणजे वास्तव सांगत आहे...
तुटलेल्या पंखांना बळ देतो आहे...
मी कणकण जोडीत जातो जे सत्य आहे..
मी लाथाळून देतो जे असत्य आहे..।।।।।।

                          ©रोहित जाधव (R.J)
                         (काव्यप्रवाह.)

   रोहित जाधव(R.J)


Monday, July 1, 2019

कविता आयुष्य जगताना....।।।

https://poemrj7.blogspot.com
                           Rohit Jadhav(R.J)
                    

        
                          
                 आयुष्य जगताना...... ।।।
    
काय फरक पडणार आहे
तुझ्या असल्या दिसण्याने
फरक पडणार आहे तो
तुझ्या असली वागण्याने

 बाहेरचे दिसते ते सुरेख रूप 
मणी लावुन जाते आंबट तूप
जे बाह्य रूप पाहून भुलले
ते प्रेमापासून दूर दूर पळले

जी असतात खुप जवळची नाती
काय त्यांना असेल तुमची माहिती
तुझ्या सुख दुःखाचा तूच सारथी
पण जपावी लागतात नाती जवळची

जगताना येथे कुणीच नसते कुणाचे
आपले जाळे आपण च विनायचे
खरी मैत्री अन कसल्या त्या भावना
संकटे येता जवळ कोणीच येईना

पण कोणी तरी असत कुणाच 
अन कोणी तरी नसत कुणाच
असणाऱ्याला आनंद दयावा
नसणाऱ्याला विसरून जावा

सुखासाठी कोण शोधत नाही कोणाला  
स्वर्गातून जुळलेले असतात बंध
घ्यावे समजून प्रेमळ नात्याला ...अन
चालना दयावी मानुसकीच्या पात्याला...
    चालना दयावी मानुसकीच्या पात्याला...।
                      
जगताना आयुष्य सतत हसत रहावे
टाकावे पाऊल पुढे मागे का वळावे
आलेच संकट वाटेवर का त्यास डरावे
देईल साथ कोणी.... नाही तर एकटेच लढावे......।।।
पण जगताना आयुष्य सतत हसत राहावे
                             © रोहित जाधव (R.J)

Saturday, June 29, 2019

लेख- माझं हि अस्तित्व आहे....।।।

https://poemrj7.blogspot.com
                           Rohit jadhav(R.J)



         
                     
                                                                                               माझं हि अस्तित्व आहे...!!
                           
किती हसत जगत असतो ना आपण लहानपणी कारण भविष्य काहीच माहिती नसते आणि कुठे लागू होतात बंधने समाजाने बांधलेली. स्वछंदी असतो ना आपण अगदी गरुडासारख.
पण वाढत्या वयाप्रमाणे लागतात बंधने समाजाची अन आम्हीही होतो मग तयार अडकण्या त्या बंधनात काळाप्रमाणे...
    असतात कोणती बंधने तर मुलींनी कशाला घराबाहेर पडावं?काय कपडे घातले आहेत?काय उपयोग एवढ शिकून आणि शिकवून? शेवटी हि तर लोकाचीच धन ना! अशी टोमणे ऐकावी लागतात घरच्यांचीच....कोणी वाईट नजरेनं बघितल अथवा छेडलं तर सांगू नकोस कोणाला आस समाजाच च सांगणं असते कारण इज्जत तर फक्त मुलीनांच असते ना...नाव तर तिचच खराब होत....डाग पण तिलाच लागतो न पुसणारा....
अशा किती अनिष्ट व परंपरेने चालत व चालवत आलेल्या समाजामध्ये काढाव लागत आयुष्य निपचित पडून पश्चाताप करत मनातल्या मनात.
कधी कधी स्वयंपाक करत बोलावं लागत, मी पण खूप हुशार होते बाळा शाळेत हे सांगण्याशिवाय काहीच उरत नाही लग्न झाल्यावर.
  का दडपते मी माझं शहाणपण? कुठे जातात शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार जे मी शाळेत शिकलेली असते?का घेत नाही मी आकाशझेप गरुडा प्रमाणे स्वछंदी ?का लागतो आसा अचानक डिस्क ब्रेक? ....त्याच हि एक कारण आहे ,
लग्न जुळलेलं असत घरच्यांच्या
मर्जीन पिढ्यान पिढ्या श्रीमंत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीशी ....काढावं लागत आयुष्य त्याच्याच नियमांत राहून.त्याचा तर एकच
उसुल असतो चूल आणि मूल.जर पंखच गुंतलेलं असतील मतभेदांच्या पिंजऱ्यात तर कुठून घेणार भरारी....


  कुठं कमी पडले मी?काय कमी होत माझ्यात?का झाले नाही मुक्त ?सर्वगुणसंपन्न आसताना का झाली नाही घरातील एक जबाबदार कर्ती स्त्री?
..... याच उत्तर हि समाजालाच देणं आहे....।
                               ©   (रोहित जाधव R.J)