🚩🚩 वीर शिवाजी...🚩🚩
खरा होता स्वाभिमानी
नाही केली कुणाची गुलामी.
नडला खुल्या मैदानी
डोक्यानी अन् तलवारीनी.
फितूर होती आपलीच नाणी
चाल करती दोन्ही बाजूंनी.
फासावर चढवली राजांनी
जात पात कधी नसे मनी.
चलाख चपळ भगवे रक्त
झुकवले दिल्लीचे तख्त.
नाही सोडला आपला पक्ष
आपुले स्वराज्य हेच लक्ष.
मर्द मावळे शिवरायांचे
पराक्रमी निधड्या छातीचे.
वार झेलले तलवारीचे
तोरण बांधले स्वराज्याचे.
निघता तलवार म्यानातूनी
रक्त सळसळते धमन्यातूनी.
घाव घातला असा शत्रुवरी
जशी वीज पडे भुईवरी.
फिरलो असतो दारोदारी
पसरून हाथ अन् झोळी.
आज जगतो ताठ मानेनी
माझा राजा होता म्हणोनी.
आहे गर्व मराठी मातीचा
सह्याद्रीचा अन् गडकिल्यांचा.
माझ्या राजाच्या पराक्रमाचा
शिव भक्ताच्या आस्तित्वाचा.
राजचा उत्सव रोजच व्हावा
घरा घरात शिवबा जन्मावा.
आज शिवजयंती करतो साजरा
माझ्या राजाला मानाचा मुजरा...मानाचा मुजरा ........🚩🚩🚩
✍️© रोहित जाधव.
8329109049