div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Monday, February 17, 2020

मरू का मारू???? कविता

 मरू का मारू????

कुणी टाकले पेट्रोल कुणी लचके ओढले
कोणत्या घाणीत तू देवा मला धाडले
विकृत समाज कधीच नाही सुधारणार
आई गरिबाची लेक आहे ना मी😢😢
तू सांग माझ्यासाठी कोणतं सरकार रडणार.??

किती वेदना सोसल्या आई तू जन्म देताना
बाप हि गहिवरला मी सोडून जाताना
आहे मी मुलगी काय माझा गुन्हा??
नकोस देऊ जन्म हा मला कधी पुन्हा..😢

गेल्यावर समजेल का मला
माझ्यावरती किती पेटवल्या मेणबत्या???
अन किती केला गाजावाजा??
आता बस्स झाला तुमचा पोकळ गाजावाजा
मला पाहिजे माझ्या शिवबा सारखा राजा..

राजे तुमी येऊ शकणार नाही कळते मला.
मीच तुमच्या पाशी येते.(हे जगणे सोडून)
खाली माझं मत कुणापाशी मांडू
कारण खाली आजून बिनधास्त जगत आहेत
गांडु.(बलात्कार करणारे)😢😢

राजे......
तुम्हीच आम्हाला सांगितलं (स्त्री अत्याचार)
या अपराधाची शिक्षा काय......
तरी का आम्हाला सरकार पुढे पसरावे लागतात
हाथ अन पाय ???????????
राजे उणीव खूप भासते तुमची काय मी करू??
काळच ठरवेल आता मीच मरू    का     मारू????

                           ©रोहित जाधव.

Monday, February 10, 2020

आई. कविता

          आई
आई किती सोसले तू हाल
कसा घालवला तो काळ.

दुःख पाचवीला पूजलेलं
पोट उपाशी हे निजलेलं.

उपाशी पोटी लढलीस तू
पोट आमची भरलीस तू.

मज साठी कष्ट केले तू अपार
कसे विसरू आई तुझे उपकार.

काय वेळ होती ती
होती रात्र वैऱ्याची.
कुना पाशी सांगू मी
साथ नव्हती कोणाची.

तुज पाशी मागणे माझे देवा
घडो माझ्या हातून
माझ्या आईची सेवा
माझ्या आईची सेवा....
           © रोहित जाधव