div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Sunday, April 10, 2022

वीर रत्ने भारताची...

 तहान भुक विसरुनी

देश सेवेत झाला भर्ती.

सुवर्ण अक्षरांनी वर्णावी

अशी तुझी महान कीर्ती.


सळसळते वीर रक्त

अन् नजरेत भडके ज्वाळा.

कुणी नजर वाकडी टाकता

ठार केलेस दुश्मनाला .


घर वात्सल्याचे सोडून

निकट केले मरणाशी.

वीर,अशोक , शौर्य चक्र

फिरती तुझ्या पायापाशी.


तुझ्याच कीर्तीचे पोवाडे

अन् शौर्याचे ते नगाडे.

धाडसी पराक्रमी धडे

गिरवता आभाळ कमी पडे.


रिंग  वाजता मोबाईल ची

काळीज फाटे बायका - पोरांची.

किंचाळीत पडला प्रश्न तिला.....

कशी ओढू रे गाडी संसाराची...........


वेळ तिरंग्यात लपेटुन येण्याची

अन् ती गर्दी झाली पाहण्याची.

ताठ मानेने सलामी देताना

वाटे हरपली वीर रत्ने भारताची....

वाटे हरपली वीर रत्ने भारताची....












क्षणभंगुर

 क्षणिक सुख सारे

काहीच नसते कायम.

परिवर्तन हा तर 

संसाराचा च नियम.


आज जरी इथे आहोत

उद्या दुसरीकडे जाऊ.

जिथे जाऊ तिथे

समाधानात राहू.


वाईट वेळेत साथ सोडली कोणी

विसरून जा तुम्ही बाजू दोन्ही.

नका करू आपसात वादविवाद

दुसऱ्यासाठी आपल्या हक्काच्या जगण्यात.


दुनिया खूप मोठी आहे

कोठे तरी जाऊन जगणारच.

चोच दिली तू भगवंता

माझ्या कष्टाला चारा तू देनारच.


कपटी, कुबुद्धि, अविचारी लोक

येतात आपल्या जीवनात.

त्यांच्या मुळे का लढायचे

आपण आपल्या सुखी घरात.


राजे तुम्हाला जेव्हा मी पाहतो

हृदयातून नाव तुमचे मुखी घेतो.

शुल्लक दुःख विसरून माझे

मी पुन्हा लढण्यास तयार होतो.


कोणत्या मातीत जगतो एकदा स्मरा

भित भित का जगतो आहे विरा.

आपल्या माणसाची साथ देऊन

 दुश्मनाला चारो चीत करा.


राजकारणी तेव्हाही होते आज पण.

गनिमी कावा तेव्हाही होते आज पण..

विजय सत्याचा तेव्हाही आज पण

कारण फक्त चांगली एकजूट , संस्कर अन शिकवण.

              

                                ©®रोहित जाधव

Thursday, February 17, 2022

🚩🚩 वीर शिवाजी...🚩🚩

 🚩🚩 वीर शिवाजी...🚩🚩

खरा होता स्वाभिमानी

नाही केली कुणाची गुलामी.

नडला खुल्या मैदानी

डोक्यानी अन् तलवारीनी.


फितूर होती आपलीच नाणी

चाल करती दोन्ही बाजूंनी.

फासावर चढवली राजांनी

जात पात कधी नसे मनी.


चलाख चपळ भगवे रक्त

झुकवले दिल्लीचे तख्त.

नाही सोडला आपला पक्ष

आपुले स्वराज्य हेच लक्ष.


मर्द मावळे शिवरायांचे

पराक्रमी निधड्या छातीचे.

वार झेलले तलवारीचे

तोरण बांधले स्वराज्याचे.


निघता तलवार म्यानातूनी

रक्त सळसळते धमन्यातूनी.

घाव घातला असा शत्रुवरी

जशी वीज पडे भुईवरी.


फिरलो असतो दारोदारी

पसरून हाथ अन् झोळी.

आज जगतो ताठ मानेनी

माझा राजा होता म्हणोनी.


आहे गर्व मराठी मातीचा

सह्याद्रीचा अन् गडकिल्यांचा.

माझ्या राजाच्या पराक्रमाचा

शिव भक्ताच्या आस्तित्वाचा.


राजचा उत्सव रोजच  व्हावा 

घरा घरात शिवबा जन्मावा.

आज शिवजयंती करतो साजरा

माझ्या राजाला मानाचा मुजरा...मानाचा मुजरा ........🚩🚩🚩


                 ✍️© रोहित जाधव.

                     8329109049