div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Monday, May 18, 2020

माझे शब्द माझे लिखाण.....कविता

माझे शब्द माझे लिखाण.....

शब्द कठीण वापरला कि
होत नाहीत कविता
उफळाव्या भावना अन
असावा अर्थ मोठा....

लिहून,वाचून,पाहून
यमक नाहीत जुळत
उगाच शब्द लावुन
विचार नाहीत कळत.

शब्द होते साधे सोपे
पण अर्थ लपले मोठे
संत बहिणाबाई
उ दा ह रण देतो इथे....

कोणता विषय घेऊ आता??
उगाच विचार करत बसतात
कोणता अवघड शब्द टाकू?
इथच सारे फसतात.

एकदा लेखणी उचलली कि
भावना प्रकट करायच्या
लेख असो की कविता
झाल्यवर पाहायच्या.

माझे अनुभव माझे विचार
माझी कविता माझे सार
माझे शब्द माझे लिखाण
हीच खऱ्या कवीची शान...
                ©रोहित जाधव


Monday, April 13, 2020

इतभर पोटाच्या काय अपेक्षा??? कविता


   इतभर पोटाच्या काय अपेक्षा???

जगण्यासाठी आहेत खूप साऱ्या वाटा
'कष्ट हे भांडवल'कर उच्चार मोठा.
आकाश सोबतीला अन धरती झोपायला
इतभर पोटाची काय अपेक्षा???
सांग आयुष्याला..

मोह,मायेच्या दुनियेत नको लोटू स्वतःला
किती केले तरी कमी पडते संसाराला..
नीतीने कमव पैसा दे शिकवण लेकाला.
इतभर पोटाची काय अपेक्षा???
 सांग आयुष्याला..

अमूल्य शरीर हे वापर हुशारीने
नकोस झिजवू उडवून तुझेच ताशोरे.
भांडण्यात ,पिण्यात नकोस जाऊ वायाला.
इतभर पोटाची काय अपेक्षा???
सांग आयुष्याला..

धन धान्य येणार नाही तू मेल्यावर
काय करून जगतो तू थोडा विचार कर.
आज आहे उद्या नाही थोडा वेळ खर्च कर.
येणार प्रत्येक क्षन हसण्यात convert कर
इतभर पोटाची काय अपेक्षा???
थोडं कष्ट कर...
                             ©रोहित जाधव
                             9730678698



कणा.... कुसुमाग्रज यांची कविता

कणा - कुसुमाग्रज

कणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!
                               

कुसुमाग्रज

Friday, April 10, 2020

कोरोना.....कविता

एका विषाणूचे आगमन 
सुन्न करून गेले आंगण.
शहरे पडली ओसाड
जसा आटलेला आड.

एकाकी उठल्या पारावरच्या गप्पा
जायबंद झाला माझा देवबप्पा.
कुण्या वेशीवर झाडे टाकलेली
कारण विषाणूने पृथ्वी माखलेली...

दृश्य सारे हे कसे पाहावे
आतल्या आत उर भरावे.
लढावे तर कसे लढावे
रडावे तर कसे रडावे.....

दूर दूर आहे सर्वच विस्कटलेलं
कुठं ठिगळं तर कुठे फाटलेलं.
लेका तू कुठे कुठे धावशील?
चौफेर लढाईत काय पाहशील?

(डॉक्टर,पोलीस आणि शासन यांचे उत्तर)
पाहून तर केव्हाच झाले
नियोजन हि आखले गेले.
कोरोनाला हि देऊ शिकस्त
मुळासकट करू उद्वस्त.
इथं नाही कोरोनाला थारा
एक आहे हिंदुस्थान सारा.

शूर वीर अन संतांची माती
जिथे नांदती अठरा पगड जाती.
जगात अव्वल अशी ही संस्कृती
तिथे कोरोनाचे काय चालती.

झुकले असतील देश सारे 
आपण नाही  झुकनार
घरी बसून कोरोनाचे प्रकरण...
 कायमचे मिटवणार....कायमचे मिटवणार....
                             ©रोहित जाधव.
                       

Monday, March 30, 2020

बाप

           बाप....

लेक निघता सासरला
मायेचा बाप गहिवरला
जगा ला सांगू लागला
पोटचा गोळा मी दिला
पोटचा गोळा मी दिला.

हुंदका दाबून आतल्या आत
फिरवून मायेचा नाजूक हाथ
साठवून दुःख मनाच्या उरात
धाडतो तुला तुझ्या संसारात.

माझे बोल नेहमी ठेव आठवनीला
बापाची अब्रू नकोस टांगू वेशीला.
दुरून डोंगर जरी दिसतात छान
पाहून त्यांना नकोस होऊ बेभान.

वाटेत तुफान येतील खूप सारी
राहून पतिव्रता दे अग्निपरीक्षा खरी
संकटी अर्ध्या रात्री साद तू घाल मला
बाप तुझा मी येईल केव्हाही मदतीला....
                       ©रोहित जाधव
                        30/03/2020.
                     

Tuesday, March 24, 2020

विषाणू कोरोना...... कविता

विषाणू कोरोना......
मलाच माहित नाही मी कुठं कमी पडलो
कधी मंगळा तर कधी चंद्रा ला शिवून आलो..
धाव धाव धावलो तंत्रज्ञानात पोहलो
आजून पाहिजे म्हणत मीच मागे राहिलो
मीच मागे राहिलो....

जबाबदार आहे मीच मागे पडण्याला
सुरवात केली होती झाडे तोडण्याला
निसर्ग किती मोठा आता मला कळले
एका विषाणूने बुद्दीमानांना जिवंत जाळले

कधी काय खावे मलाच नाही कळले
कोरोना येता पाणी तोंडाचे पळले
क्षणात केले आप आपले देश बंद
सर्दी येता बोलू राहिले नको तुझा संबंध

कोरोना येता माणूस विभागला माणसा पासून.
नाक तोंड बंद करी गेला जरी कोणी घासून
पाश्चात्य संस्कृतीचे आता कळले मला तोटे
विश्वात आपली संस्कृती अन आपणच मोठे

बलशाली देश हे चीन,अमेरीका,इटली
कोरोना रोखण्यासाठी पॅन्ट मात्र फिटली
आता आपली बारी आपण हि कंबर कसू
काही दिवस तरी निवांत घरात बसू....

पसरले आपल्या देशात कोरोनाचे थैमान
फसव्या अफवा पसरवून नका होऊ बेईमान
खरंच इच्छा असेल करायची देश सेवा
हाथ,पाय स्वच्छ धुऊन घरीच TV पहा.

आहेत देवळे बंद तरी लांबून हाथ जोडू
कोरोनाची साखळी घरी बसून तोडू
सर्दी,खोकला,ताप लागलीच उपचार घेऊ
आलेल्या संकटाला मिळून तोंड देऊ....

विनंती माझी एक only for चायना
काय खावे कसे राहावे याचे भान रखोना
तुम्हा आम्हा खूप मोठी शिकवन देऊन गेला विषाणू कोरोना....विषाणू कोरोना
                           ✍️      ©रोहित जाधव.

Sunday, March 8, 2020

जाहिरातींची धास्ती....


जाहिरातींची धास्ती.....

इवल्या जाहिरातींनी खूप घातली धास्ती
विज्ञानाच्या युगात शिकलेले च फसती
धुतला नाही हाथ तर किटाणू पोट खाती
अधीन झालो लागून जाहिरातीच्या नादी.


अस्सल श्रीमंत लोक काय त्यांना कमी
वैद्य सांगी रोज त्यास चारा अन पाणी
एवढा पैसे असून तरी कुठे कमी पडले
रोज check up पण किती आयुष्य वाडले.


पुर्वी चा काळ खूप होता चांगला 
साधी च झोपडी कुठे होता बंगला
कुठे होते RO शुद्ध करण्या पाणी
नसे tension कारण गोड होती वाणी


 नसे साखर खाल्ला ऊस मुळा सकट
आला जरी ताप तर औषध होत फुकट
कुठे पडले दात घासले नाही कोलगेट
डेंटिस्ट कड जायला बाप नव्हता बिलगेट.


लावला कोणता जरी साबण  
वाढते वय लपते का
फसव्या साऱ्या जाहिराती
पहा तुम्हाला पटते का....

              ©रोहित जाधव


Monday, February 17, 2020

मरू का मारू???? कविता

 मरू का मारू????

कुणी टाकले पेट्रोल कुणी लचके ओढले
कोणत्या घाणीत तू देवा मला धाडले
विकृत समाज कधीच नाही सुधारणार
आई गरिबाची लेक आहे ना मी😢😢
तू सांग माझ्यासाठी कोणतं सरकार रडणार.??

किती वेदना सोसल्या आई तू जन्म देताना
बाप हि गहिवरला मी सोडून जाताना
आहे मी मुलगी काय माझा गुन्हा??
नकोस देऊ जन्म हा मला कधी पुन्हा..😢

गेल्यावर समजेल का मला
माझ्यावरती किती पेटवल्या मेणबत्या???
अन किती केला गाजावाजा??
आता बस्स झाला तुमचा पोकळ गाजावाजा
मला पाहिजे माझ्या शिवबा सारखा राजा..

राजे तुमी येऊ शकणार नाही कळते मला.
मीच तुमच्या पाशी येते.(हे जगणे सोडून)
खाली माझं मत कुणापाशी मांडू
कारण खाली आजून बिनधास्त जगत आहेत
गांडु.(बलात्कार करणारे)😢😢

राजे......
तुम्हीच आम्हाला सांगितलं (स्त्री अत्याचार)
या अपराधाची शिक्षा काय......
तरी का आम्हाला सरकार पुढे पसरावे लागतात
हाथ अन पाय ???????????
राजे उणीव खूप भासते तुमची काय मी करू??
काळच ठरवेल आता मीच मरू    का     मारू????

                           ©रोहित जाधव.

Monday, February 10, 2020

आई. कविता

          आई
आई किती सोसले तू हाल
कसा घालवला तो काळ.

दुःख पाचवीला पूजलेलं
पोट उपाशी हे निजलेलं.

उपाशी पोटी लढलीस तू
पोट आमची भरलीस तू.

मज साठी कष्ट केले तू अपार
कसे विसरू आई तुझे उपकार.

काय वेळ होती ती
होती रात्र वैऱ्याची.
कुना पाशी सांगू मी
साथ नव्हती कोणाची.

तुज पाशी मागणे माझे देवा
घडो माझ्या हातून
माझ्या आईची सेवा
माझ्या आईची सेवा....
           © रोहित जाधव

Friday, January 31, 2020

कविता म्हणजे...

कविता म्हणजे...

कविता म्हणजे जगण्याचे लेणे
विचारांच्या शब्दांचे एक गाणे.

कविता म्हणजे मखमली वस्त्र
चुकल्या समाज्याला भेदणारे शस्त्र.

कविता म्हणजे एक नवी दिशा
फाडते पाघंरलेली नकली वेशभूषा.

कविता म्हणजे तरुणांचे बळ
घडवते क्रांतीची एक चळवळ.

कविता म्हणजे सागराची लाट
दाखवते जगण्याची वाट.

कविता म्हणजे स्रोत ऊर्जेचा
तुमच्या आमच्या सर्वांच्या गरजेचा....
                     © रोहित जाधव.

Thursday, January 9, 2020

व्यक्त व्हाव कि अव्यक्त ...।।।कविता

व्यक्त व्हाव कि अव्यक्त ...।।।

घुसमट मनाची मनालाच जाळी
विचारांचे वादळ मज लोटून देई
आजून किती दिवस राहू मी अव्यक्त
कळेना काहीच कुठे होऊ व्यक्त.

तडफत होत्या विखुरलेल्या भावना
मन माझे आता माझ्याशी बोलेना
तुटत होते माझे मन थोडे थोडे
कसे व्हावे व्यक्त हेच मोठे कोडे.

आता व्यक्त व्हावे तर कुणापाशी
राहिलित का माणसे भरवश्याची
ऐकून घेतात आपल्या डोळ्यांपाशी
अन खेळतात खेळ आपल्या भावनांशी.

मना ऐकण्या तुझे दुःखाचे गाराने
येतील लोग वेग वेगळया तऱ्येने
हि तर सारी आहे बघ्याची  जनता
थकलेल्या मना सोडव तू तुझाच गुंथा.


घालमेल जीवाची करण्या मोकळी
गुंफ तू खास माणसांची साखळी
झालाच मनात विचारांचा कचरा
खास व्यक्तीच करेल त्याचा निचरा....।।
                           © रोहित जाधव (R.J)