div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Sunday, April 10, 2022

वीर रत्ने भारताची...

 तहान भुक विसरुनी

देश सेवेत झाला भर्ती.

सुवर्ण अक्षरांनी वर्णावी

अशी तुझी महान कीर्ती.


सळसळते वीर रक्त

अन् नजरेत भडके ज्वाळा.

कुणी नजर वाकडी टाकता

ठार केलेस दुश्मनाला .


घर वात्सल्याचे सोडून

निकट केले मरणाशी.

वीर,अशोक , शौर्य चक्र

फिरती तुझ्या पायापाशी.


तुझ्याच कीर्तीचे पोवाडे

अन् शौर्याचे ते नगाडे.

धाडसी पराक्रमी धडे

गिरवता आभाळ कमी पडे.


रिंग  वाजता मोबाईल ची

काळीज फाटे बायका - पोरांची.

किंचाळीत पडला प्रश्न तिला.....

कशी ओढू रे गाडी संसाराची...........


वेळ तिरंग्यात लपेटुन येण्याची

अन् ती गर्दी झाली पाहण्याची.

ताठ मानेने सलामी देताना

वाटे हरपली वीर रत्ने भारताची....

वाटे हरपली वीर रत्ने भारताची....












क्षणभंगुर

 क्षणिक सुख सारे

काहीच नसते कायम.

परिवर्तन हा तर 

संसाराचा च नियम.


आज जरी इथे आहोत

उद्या दुसरीकडे जाऊ.

जिथे जाऊ तिथे

समाधानात राहू.


वाईट वेळेत साथ सोडली कोणी

विसरून जा तुम्ही बाजू दोन्ही.

नका करू आपसात वादविवाद

दुसऱ्यासाठी आपल्या हक्काच्या जगण्यात.


दुनिया खूप मोठी आहे

कोठे तरी जाऊन जगणारच.

चोच दिली तू भगवंता

माझ्या कष्टाला चारा तू देनारच.


कपटी, कुबुद्धि, अविचारी लोक

येतात आपल्या जीवनात.

त्यांच्या मुळे का लढायचे

आपण आपल्या सुखी घरात.


राजे तुम्हाला जेव्हा मी पाहतो

हृदयातून नाव तुमचे मुखी घेतो.

शुल्लक दुःख विसरून माझे

मी पुन्हा लढण्यास तयार होतो.


कोणत्या मातीत जगतो एकदा स्मरा

भित भित का जगतो आहे विरा.

आपल्या माणसाची साथ देऊन

 दुश्मनाला चारो चीत करा.


राजकारणी तेव्हाही होते आज पण.

गनिमी कावा तेव्हाही होते आज पण..

विजय सत्याचा तेव्हाही आज पण

कारण फक्त चांगली एकजूट , संस्कर अन शिकवण.

              

                                ©®रोहित जाधव

Thursday, February 17, 2022

🚩🚩 वीर शिवाजी...🚩🚩

 🚩🚩 वीर शिवाजी...🚩🚩

खरा होता स्वाभिमानी

नाही केली कुणाची गुलामी.

नडला खुल्या मैदानी

डोक्यानी अन् तलवारीनी.


फितूर होती आपलीच नाणी

चाल करती दोन्ही बाजूंनी.

फासावर चढवली राजांनी

जात पात कधी नसे मनी.


चलाख चपळ भगवे रक्त

झुकवले दिल्लीचे तख्त.

नाही सोडला आपला पक्ष

आपुले स्वराज्य हेच लक्ष.


मर्द मावळे शिवरायांचे

पराक्रमी निधड्या छातीचे.

वार झेलले तलवारीचे

तोरण बांधले स्वराज्याचे.


निघता तलवार म्यानातूनी

रक्त सळसळते धमन्यातूनी.

घाव घातला असा शत्रुवरी

जशी वीज पडे भुईवरी.


फिरलो असतो दारोदारी

पसरून हाथ अन् झोळी.

आज जगतो ताठ मानेनी

माझा राजा होता म्हणोनी.


आहे गर्व मराठी मातीचा

सह्याद्रीचा अन् गडकिल्यांचा.

माझ्या राजाच्या पराक्रमाचा

शिव भक्ताच्या आस्तित्वाचा.


राजचा उत्सव रोजच  व्हावा 

घरा घरात शिवबा जन्मावा.

आज शिवजयंती करतो साजरा

माझ्या राजाला मानाचा मुजरा...मानाचा मुजरा ........🚩🚩🚩


                 ✍️© रोहित जाधव.

                     8329109049



Sunday, June 20, 2021

देवा...!

 


देवा...!

तुझ्या विना नाही कोणी

तूच आमचा बाप.

तुझ्याच  हाथी माप सारे

तूच आमचा आधार.


अठ्ठावीस युगे उभा 

राहिलास तू विठेवरी.

राम रहीम एक सारे

तूच आमचा कैवारी.


भक्ती माझी तुझ्या ठाई

आस भेटीची ती लावी.

तुझ्याच दर्शना साठी सांग

होणार कधी वाट ही मोकळी.


हास्य दडले ते माझे

मास्क च्या आत.

उगडे डोळे नको दाबू

हॉस्पिटल च्या उंबर्‍यात.


जीवा भावा सर्व विसरी

दुःख राही अंतर मनात. 

वाट मोकळी आसूनी

आडकलो मी माझ्याच पिंजऱ्यात.


अंध नाही जीवापाड

आहे माझा विश्वास.

तूच येणार उद्या नव्याने

घेऊन एक नवा श्वास .

घेऊन एक नवा श्वास.......

                © रोहित जाधव.


Monday, May 18, 2020

माझे शब्द माझे लिखाण.....कविता

माझे शब्द माझे लिखाण.....

शब्द कठीण वापरला कि
होत नाहीत कविता
उफळाव्या भावना अन
असावा अर्थ मोठा....

लिहून,वाचून,पाहून
यमक नाहीत जुळत
उगाच शब्द लावुन
विचार नाहीत कळत.

शब्द होते साधे सोपे
पण अर्थ लपले मोठे
संत बहिणाबाई
उ दा ह रण देतो इथे....

कोणता विषय घेऊ आता??
उगाच विचार करत बसतात
कोणता अवघड शब्द टाकू?
इथच सारे फसतात.

एकदा लेखणी उचलली कि
भावना प्रकट करायच्या
लेख असो की कविता
झाल्यवर पाहायच्या.

माझे अनुभव माझे विचार
माझी कविता माझे सार
माझे शब्द माझे लिखाण
हीच खऱ्या कवीची शान...
                ©रोहित जाधव


Monday, April 13, 2020

इतभर पोटाच्या काय अपेक्षा??? कविता


   इतभर पोटाच्या काय अपेक्षा???

जगण्यासाठी आहेत खूप साऱ्या वाटा
'कष्ट हे भांडवल'कर उच्चार मोठा.
आकाश सोबतीला अन धरती झोपायला
इतभर पोटाची काय अपेक्षा???
सांग आयुष्याला..

मोह,मायेच्या दुनियेत नको लोटू स्वतःला
किती केले तरी कमी पडते संसाराला..
नीतीने कमव पैसा दे शिकवण लेकाला.
इतभर पोटाची काय अपेक्षा???
 सांग आयुष्याला..

अमूल्य शरीर हे वापर हुशारीने
नकोस झिजवू उडवून तुझेच ताशोरे.
भांडण्यात ,पिण्यात नकोस जाऊ वायाला.
इतभर पोटाची काय अपेक्षा???
सांग आयुष्याला..

धन धान्य येणार नाही तू मेल्यावर
काय करून जगतो तू थोडा विचार कर.
आज आहे उद्या नाही थोडा वेळ खर्च कर.
येणार प्रत्येक क्षन हसण्यात convert कर
इतभर पोटाची काय अपेक्षा???
थोडं कष्ट कर...
                             ©रोहित जाधव
                             9730678698



कणा.... कुसुमाग्रज यांची कविता

कणा - कुसुमाग्रज

कणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!
                               

कुसुमाग्रज

Friday, April 10, 2020

कोरोना.....कविता

एका विषाणूचे आगमन 
सुन्न करून गेले आंगण.
शहरे पडली ओसाड
जसा आटलेला आड.

एकाकी उठल्या पारावरच्या गप्पा
जायबंद झाला माझा देवबप्पा.
कुण्या वेशीवर झाडे टाकलेली
कारण विषाणूने पृथ्वी माखलेली...

दृश्य सारे हे कसे पाहावे
आतल्या आत उर भरावे.
लढावे तर कसे लढावे
रडावे तर कसे रडावे.....

दूर दूर आहे सर्वच विस्कटलेलं
कुठं ठिगळं तर कुठे फाटलेलं.
लेका तू कुठे कुठे धावशील?
चौफेर लढाईत काय पाहशील?

(डॉक्टर,पोलीस आणि शासन यांचे उत्तर)
पाहून तर केव्हाच झाले
नियोजन हि आखले गेले.
कोरोनाला हि देऊ शिकस्त
मुळासकट करू उद्वस्त.
इथं नाही कोरोनाला थारा
एक आहे हिंदुस्थान सारा.

शूर वीर अन संतांची माती
जिथे नांदती अठरा पगड जाती.
जगात अव्वल अशी ही संस्कृती
तिथे कोरोनाचे काय चालती.

झुकले असतील देश सारे 
आपण नाही  झुकनार
घरी बसून कोरोनाचे प्रकरण...
 कायमचे मिटवणार....कायमचे मिटवणार....
                             ©रोहित जाधव.
                       

Monday, March 30, 2020

बाप

           बाप....

लेक निघता सासरला
मायेचा बाप गहिवरला
जगा ला सांगू लागला
पोटचा गोळा मी दिला
पोटचा गोळा मी दिला.

हुंदका दाबून आतल्या आत
फिरवून मायेचा नाजूक हाथ
साठवून दुःख मनाच्या उरात
धाडतो तुला तुझ्या संसारात.

माझे बोल नेहमी ठेव आठवनीला
बापाची अब्रू नकोस टांगू वेशीला.
दुरून डोंगर जरी दिसतात छान
पाहून त्यांना नकोस होऊ बेभान.

वाटेत तुफान येतील खूप सारी
राहून पतिव्रता दे अग्निपरीक्षा खरी
संकटी अर्ध्या रात्री साद तू घाल मला
बाप तुझा मी येईल केव्हाही मदतीला....
                       ©रोहित जाधव
                        30/03/2020.
                     

Tuesday, March 24, 2020

विषाणू कोरोना...... कविता

विषाणू कोरोना......
मलाच माहित नाही मी कुठं कमी पडलो
कधी मंगळा तर कधी चंद्रा ला शिवून आलो..
धाव धाव धावलो तंत्रज्ञानात पोहलो
आजून पाहिजे म्हणत मीच मागे राहिलो
मीच मागे राहिलो....

जबाबदार आहे मीच मागे पडण्याला
सुरवात केली होती झाडे तोडण्याला
निसर्ग किती मोठा आता मला कळले
एका विषाणूने बुद्दीमानांना जिवंत जाळले

कधी काय खावे मलाच नाही कळले
कोरोना येता पाणी तोंडाचे पळले
क्षणात केले आप आपले देश बंद
सर्दी येता बोलू राहिले नको तुझा संबंध

कोरोना येता माणूस विभागला माणसा पासून.
नाक तोंड बंद करी गेला जरी कोणी घासून
पाश्चात्य संस्कृतीचे आता कळले मला तोटे
विश्वात आपली संस्कृती अन आपणच मोठे

बलशाली देश हे चीन,अमेरीका,इटली
कोरोना रोखण्यासाठी पॅन्ट मात्र फिटली
आता आपली बारी आपण हि कंबर कसू
काही दिवस तरी निवांत घरात बसू....

पसरले आपल्या देशात कोरोनाचे थैमान
फसव्या अफवा पसरवून नका होऊ बेईमान
खरंच इच्छा असेल करायची देश सेवा
हाथ,पाय स्वच्छ धुऊन घरीच TV पहा.

आहेत देवळे बंद तरी लांबून हाथ जोडू
कोरोनाची साखळी घरी बसून तोडू
सर्दी,खोकला,ताप लागलीच उपचार घेऊ
आलेल्या संकटाला मिळून तोंड देऊ....

विनंती माझी एक only for चायना
काय खावे कसे राहावे याचे भान रखोना
तुम्हा आम्हा खूप मोठी शिकवन देऊन गेला विषाणू कोरोना....विषाणू कोरोना
                           ✍️      ©रोहित जाधव.