एका विषाणूचे आगमन
सुन्न करून गेले आंगण.
शहरे पडली ओसाड
जसा आटलेला आड.
एकाकी उठल्या पारावरच्या गप्पा
जायबंद झाला माझा देवबप्पा.
कुण्या वेशीवर झाडे टाकलेली
कारण विषाणूने पृथ्वी माखलेली...
दृश्य सारे हे कसे पाहावे
आतल्या आत उर भरावे.
लढावे तर कसे लढावे
रडावे तर कसे रडावे.....
दूर दूर आहे सर्वच विस्कटलेलं
कुठं ठिगळं तर कुठे फाटलेलं.
लेका तू कुठे कुठे धावशील?
चौफेर लढाईत काय पाहशील?
(डॉक्टर,पोलीस आणि शासन यांचे उत्तर)
पाहून तर केव्हाच झाले
नियोजन हि आखले गेले.
कोरोनाला हि देऊ शिकस्त
मुळासकट करू उद्वस्त.
इथं नाही कोरोनाला थारा
एक आहे हिंदुस्थान सारा.
शूर वीर अन संतांची माती
जिथे नांदती अठरा पगड जाती.
जगात अव्वल अशी ही संस्कृती
तिथे कोरोनाचे काय चालती.
झुकले असतील देश सारे
आपण नाही झुकनार
घरी बसून कोरोनाचे प्रकरण...
कायमचे मिटवणार....कायमचे मिटवणार....
©रोहित जाधव.
No comments:
Post a Comment