- Visit #काव्यप्रवाह on fb. महापूर
अर्धी स्वप्ने गेली पुरात वाहून
मग पुसल्या साऱ्या वाटा
जगणे माझे वाचले पण
वाचला का गाईचा गोटा ?
उगड्या डोळयांनी पाहून
डोळे माझे भिरभिरले
वाहता संसार पाहून
उजेडात तारे दिसले.
तुटलेल्या स्वप्नात आता
गीत कोणते गावे
अंधाराला गिळले तरी
पोट उपाशीच निजावे.
नुसतीच लुडबुड करीत
आले पक्ष्यांचे थवे
मदतीचे देखावे नुसते उभे
दहा माणसे उपाशी अन
हाथी 2 सरकारी डबे.
भिऊन तुला आजचा (पुरास आव्हान केले आहे)
एक दिवस दूर जाऊ
जाता जाता पडक्या
भिंती निरखून पाहू.
गवसणी घालाय माय
भूमीवर नक्कीच येऊ
चिखलात पडलेल्या भिंती
पाशी अलगत जाऊ .
अन तुटलेल्या छताखाली
पण राहू
वाहून गेलेल्या काळ्या
आईस निरखून पाहू.
नुसते पाहून नाही थांबणार
गात गाऱ्हाणे मागचे
नाही रडणार.
नव्याने नवजीवन जगण्यासाठी ,
मी.....
पुन्हा पुन्हा लढणार ...मी....पुन्हा पुन्हा लढणार
© रोहित जाधव(R.J)
Visit #काव्यप्रवाह on fb.
No comments:
Post a Comment