div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Tuesday, October 22, 2019

कविता #ओळखी चे घर ..

# ओळखी चे घर ..

ओळखी चे घर माझे
आज दूर झाले
दाटलेल्या आभाळागत
मन माझे भरून आले
सख्खे नाते ते माझे 
आज पोरके झाले.


वाट होती काट्याची पण
आपुलकी आणि प्रेमाची
माणसे होती भोळी पण 
श्रद्धाळू आणी स्नेहाची
घरे आहेत साधी पण 
शक्ती आणि भक्तीची
तेच घर आडोशाला गेले
ओळखी चे घर माझे
आज दूर झाले.

बिथरलेल्या डोळ्यांनी....
वर पाहता पाहता.....
पाटाचे पाणी स्थिर झाले
हिरवेगार शिवार ते ही 
आता दिसेनासे झाले..

निरोप घेता  हृदय माझे 
भरून आले....
दाटलेले अश्रू आज 
मोकळे झाले
हसऱ्या चेहऱ्याचे आज
रूप वेगळेच झाले
ओळखी चे घर माझे
आज दूर झाले

डोळ्यातील अश्रू आता 
गाला वरती आले
हुदंक्याने माझ्या सर्वच 
गहिवरून गेले
निरोप देता घराला 
आठवणीचे ओझे खांद्यावर आले...
ओळखी चे घर माझे
आज दूर झाले.....आज दूर झाले..।

                   © रोहित जाधव (R.J)
                Visit  काव्यप्रवाह page on fb.

No comments:

Post a Comment