div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Thursday, November 14, 2019

पती-पत्नी



   पती-पत्नी

ओळख नव्हती कधी
ना पहिले एकमेका आधी
नाते जुळून आले
लग्नाचे मुहर्त पहिले.

घेऊन झाल्या सात फेऱ्या
मंगलाष्टका झाली
सर्वांचा आशीर्वाद घेऊनी  
नवरी नवऱ्या घरी निघाली .

मना मध्ये विचार आला 
पती-पत्नी म्हणतात कोणाला....?
सुख दुःखात सदा सोबती
तेच पवित्र नाते पती-पत्नी
सात जन्माचा सोबती
तेच पवित्र नाते पती-पत्नी .

पती-पत्नी प्रेमाचा एक संगम
नव्या जीवाचा एक उगम
अतुट विश्वासाचे बंधन 
करी संसाराचे नंदन. 
                                ©रोहित  जाधव .
         Visit- काव्यप्रवाह page on fb.

No comments:

Post a Comment