स्वप्न .....
तुटलेल्या स्वप्नांना आस होती
नव्याने पुन्हा पडण्याची..।
कारणे कळत नव्हती काहीच
डोळ्यात खारे पाणी वाढण्याची.
मधुर स्वप्नांच्या त्या राती..।।।
तुझा हात होता माझ्या हाती
डोळेच सारा भाव ओळखती
प्रिये जेव्हा तू एकटक पाहती.
दडपण नसे स्वप्न पाहण्याला
अंकुश नव्हते माझ्या मनाला..
वागणेच चुकले असेल काही
का दोष देऊ स्वप्नाच्या जगाला.
मोकळे करू तू पाहत होती
त्या अंधारातल्या बंद खोलीला
तू सूर्याचा एक किरण आहेस
उजेड देती अंधाऱ्या रातीला.
दिसते तु अशी जसे इवलेशे बीज
पाहतो तुझ्यात लखलखती वीज
तुझ्यात भासते मज वर्षाची लहर
रुपात तुझ्या पडे पावसाची सर.
नकोस तोडू तू माझ्या स्वप्नांना
रोकेल मी या पहाटेच्या क्षणाला
आहेस तू जवळ देई मज इशारा
धावणारे ढग अ्न सावरणारा वारा..।
©रोहित जाधव (R.J)
तुटलेल्या स्वप्नांना आस होती
नव्याने पुन्हा पडण्याची..।
कारणे कळत नव्हती काहीच
डोळ्यात खारे पाणी वाढण्याची.
मधुर स्वप्नांच्या त्या राती..।।।
तुझा हात होता माझ्या हाती
डोळेच सारा भाव ओळखती
प्रिये जेव्हा तू एकटक पाहती.
दडपण नसे स्वप्न पाहण्याला
अंकुश नव्हते माझ्या मनाला..
वागणेच चुकले असेल काही
का दोष देऊ स्वप्नाच्या जगाला.
मोकळे करू तू पाहत होती
त्या अंधारातल्या बंद खोलीला
तू सूर्याचा एक किरण आहेस
उजेड देती अंधाऱ्या रातीला.
दिसते तु अशी जसे इवलेशे बीज
पाहतो तुझ्यात लखलखती वीज
तुझ्यात भासते मज वर्षाची लहर
रुपात तुझ्या पडे पावसाची सर.
नकोस तोडू तू माझ्या स्वप्नांना
रोकेल मी या पहाटेच्या क्षणाला
आहेस तू जवळ देई मज इशारा
धावणारे ढग अ्न सावरणारा वारा..।
©रोहित जाधव (R.J)
No comments:
Post a Comment