div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Thursday, November 28, 2019

सावध हो रे सावध हो.... कविता

सावध हो रे  सावध हो...


सावध हो रे  सावध हो
माझ्या मित्रा सावध हो..
प्रेमापासून थोडा
लांबच हो...लांबच हो..
दिवस होते कॉलेजचे प्रेमात
बहरून पाडण्याचे....
काळी गोरी अ्न शेंबडी पोर
आवडायची मला खरोखर
मेकअप चालायचा तिचा सर्वांसमोर...

भुललो ना भाऊ तिच्या मेकअपला...
डायरेक्ट नडलो तिच्या बॉयफ्रेंड ला
झाली ओवरेक्टींग माझी थोर
पडली माझ्या गळ्यात ती पोर
खालती वरती काहीच सुचेना
 रातभर ती पोर मले झोपूच देइना.

चांगलाच वाढला आमच्या प्रेमाचा स्कोर
 मॅथ अ्न इंग्लिश वाटू लागले बोर..
मधूनच जायचो हॉटेलला पाव भाजी
अण आइस्क्रीम चाटायला...
बिलाचे पैसे माझ्या वाट्याला
नसलेच तर सांगायचो टिपायला.

गाडीवरचे नखरे काय सांगू तुला
हात सोडून गाडी चालव म्हणे मला
कॉन्फिडन्स गेला माझा शिगेला
डायरेक्ट हात घातला तिच्या चॅलेंजला..

तिला उभे केले एका बाजूला
दोन्ही हात माझे झाले साईडला
उताना पडलो  रस्त्याच्या कडेला
पोर गेली टमटमने आपल्या घरला
पण बापाने मला चहूबाजूंनी घेरला.

मी म्हणे तिला तु हे बरं नाही केलं
एकट्याला सोडून तू घर जवळ केल..
ती म्हणे तुला ॲक्शन नाही जमत
हात सोडून गाडी तुला नाही जुळत.

भांडणात आमचं ब्रेक-अप झालं
मोडक्या हाताच दुखणं माझ्या गळ्यात आलं
हॉटेलचे बिल देण नाही झालं .
भांडी घासण्याचं काम माझ्या नशिबी आल.

तिच्या भावाचं मला आमंत्रण आलं
धडधड काळीज घाबरून गेल...
ईचारात रात भर थंडीत मेलं
कुणास ठाऊक त्या कार्टीन...
घरी काय काय सांगितलं?

सकाळ सकाळ तिच्या दारात
लोटांगण घातल ...अ्न ओरडून सांगितलं
आपच प्रेम प्रकरण केव्हाच संपल..
केव्हाच संपल.....😢😢😢
सावध हो रे  सावध हो
 माझ्या मित्रा सावध हो....
प्रेमापासून थोडा
लांबच हो...लांबच हो..
               © रोहित जाधव (R.J)

No comments:

Post a Comment