div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Saturday, November 30, 2019

लढ खुर्चीसाठी.... !!! कविता

लढ खुर्चीसाठी.... !!!

कुणी बोलतं सत्ता आली
कुणी बोललं सत्ता गेली
तुमच्या सत्तेच्या पायी
आई शेतकऱ्याची मेली.

सत्ता येता कोण करतो माज
तर कोण चढवतो आवाज
तुमच्या माजात अन आवाजात
माझा शेतकरी मरतो कर्जात.

आज जरी असतील इकडे
उद्या दिसतील तिकडे
कसा बसवतील विचारांचा मेळ?
कारण,पक्षांतर आहे एक खेळ.

कधी वाटतं का करावं मतदान
तर कधी वाटतं का द्यावं निवडून
कारण आपलेच देशात आणतात
भ्रष्टाचार अन दंगली घडवून.

आज आहे याच सरकार 
उद्या येईल त्याच सरकार
तुमच्या आमच्या सरकारात
असे किती दिवस होतील बलात्कार ????
तर कधी थांबतील स्त्रियांवरचे अत्याचार ????
                          ©रोहित जाधव(R.J)
Visit #काव्यप्रवाह page on fb.

No comments:

Post a Comment