div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Monday, July 1, 2019

कविता आयुष्य जगताना....।।।

https://poemrj7.blogspot.com
                           Rohit Jadhav(R.J)
                    

        
                          
                 आयुष्य जगताना...... ।।।
    
काय फरक पडणार आहे
तुझ्या असल्या दिसण्याने
फरक पडणार आहे तो
तुझ्या असली वागण्याने

 बाहेरचे दिसते ते सुरेख रूप 
मणी लावुन जाते आंबट तूप
जे बाह्य रूप पाहून भुलले
ते प्रेमापासून दूर दूर पळले

जी असतात खुप जवळची नाती
काय त्यांना असेल तुमची माहिती
तुझ्या सुख दुःखाचा तूच सारथी
पण जपावी लागतात नाती जवळची

जगताना येथे कुणीच नसते कुणाचे
आपले जाळे आपण च विनायचे
खरी मैत्री अन कसल्या त्या भावना
संकटे येता जवळ कोणीच येईना

पण कोणी तरी असत कुणाच 
अन कोणी तरी नसत कुणाच
असणाऱ्याला आनंद दयावा
नसणाऱ्याला विसरून जावा

सुखासाठी कोण शोधत नाही कोणाला  
स्वर्गातून जुळलेले असतात बंध
घ्यावे समजून प्रेमळ नात्याला ...अन
चालना दयावी मानुसकीच्या पात्याला...
    चालना दयावी मानुसकीच्या पात्याला...।
                      
जगताना आयुष्य सतत हसत रहावे
टाकावे पाऊल पुढे मागे का वळावे
आलेच संकट वाटेवर का त्यास डरावे
देईल साथ कोणी.... नाही तर एकटेच लढावे......।।।
पण जगताना आयुष्य सतत हसत राहावे
                             © रोहित जाधव (R.J)

No comments:

Post a Comment