#बाबा....!
#बाबा.....!
श्वास दाटले माझे त्या गर्भात
नकोस आडवू येने माझे या जगात
दाटले अश्रू माझे आतल्या आत
माझ्याच वाट्याला का येतो गर्भपात?
कोनते घडले ते माझ्या हातुन पाप?
#बाबा.....!
आई ,बहिन ,बायको तुम्हास लागे
मग कोमल कन्येस का तु त्यागे?
ठेव भरवसा माझ्या त्या मनगटावर
का रोखतो मला तु अर्ध्या वाटेवर?
जन्माआधीच मरणे नको माझ्या माथ्यावर ..
#बाबा.....!
निखळ स्वप्ने माझी नाही काही वाईट
कधि कधि समाजाचा येई मज इट
न्याहाळु दे मज या दुनियेची रीत
धावशील ना तु माझ्या या लडाईत?
#बाबा.....!
अर्ध्ये जगने असेल तुझ्या पाशी
अर्ध्ये सोपवले दुसर्याच्या हाथी
काय लिहले ते माझ्या माथी???
कसा असेल तो जिवन साथी?.
#बाबा.....!
पाहीजे घरा-घरात मायेची लेक
जुळे नात्यास नात्ये घाली सांगड सुरेख
काहिच मागने नाही..काहिच मागने नाही
निच्छितं राहीन मी आईच्या पदरात
नकोस फुंकर मारु आमच्या नात्यात
देईन मी तुझीच साथ संकटात
नकोस फुंकर मारु आमच्या नात्यात.
© रोहित जाधव(R. J)
#काव्यप्रवाह

No comments:
Post a Comment