https://poemrj7.blogspot.com
खरं आहोत का आपण व्यस्त?
Rohit Jadhav(R.J).
व्यस्त...!!!
व्यस्त...!!!
खरं आहोत का आपण व्यस्त?
हातात मोबाईल एकदम मस्त
गाव विसरला भाचा मामाच
सवय लागली बीजी जगायच
क्लास मध्ये हरवले बालपन
मोबाइलन वाया गेल तरुणपण
युट्युब वर टाईमपास झाला इजी
ओरडू राहिले आमी खूप बीझी
समजलं दुनिया झाली फास्ट
ऑफिस च वाटू लागले बेस्ट
कुटुंबासाठी वेळ एकदम वेस्ट
व्यायाम नाही कर बीपी,शुगर टेस्ट
काम कमी नखरे झाले थोर
हाथी मोबाईल कडेवर पोर
अलार्म ची वाजु लागली बेल
सिरीयल पायी झाला होता वेळ
फोन त्याचा आला तरच करेन
फ्री क्वालिंग पण बिल फुकट भरेन
मोबाईल जरी झाले असले स्वस्त
काय उपयोग माणसं झाली व्यस्त....।।।
©रोहित जाधव (R.J)
(काव्यप्रवाह.)
No comments:
Post a Comment