div#contactform1 {display: non ! important;}

Contact Form

Name

Email *

Message *

Monday, July 22, 2019

लेख राग...!

https://poemrj7.blogspot.com.                  Follow काव्यप्रवाह page on fb.                                         Rohit jadhav(R.J)                                                                                                                                        
                                           
                          राग.....।।।


किती लहान शब्द आहे ना ,पण जर त्याने रुद्र रूप धारण केले किंवा तो शिगेला पोहचला मर्यादेच्या पलीकडे तर किती गोष्टी बिघडतात,किती मने तुटतात काहीच्या काही बोलून किंवा कृत्य करून जातो आपण तेवढया एका,अविचारी क्षणात आणि तोच क्षण मग करून जातो आयुष्याचा खेळ खंडोबा मग पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही आयुष्यभर.
    जगात अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही की त्याला राग येत नाही किंवा आलेला नाही.एखादया खटकणाऱ्या गोष्टीवरून राग येणे हे स्वाभाविक आहे आणि तो आला हि पाहिजे कारण प्रेमळ स्वभावाचा हि काही जण फायदा घेऊन त्रास देतात.तुम्ही मुंगीला डीवचा तीला हि राग येईल.
      राग आतल्या आत गिळून मनाचा कोंडमारा करणे हे देखील चुकीचे आहे तो व्यक्त हि केला पाहिजे मर्यादेच्या सीमेत राहून त्याचा अतिरेक किंवा रागाचे रूपांतर वैर व सूड भावनेत करून स्वतःच्या आयुष्याची वाट लावण्यात कोणते तथ्य आहे .
           राग न येणे हे जरी अशक्य असले तरी त्यावर समुपदेशाने नियंत्रण करून परिस्थिती हाथाळने हे आपल्या हाथात आहे.
         अपवाद वगळता आपण राग हा नेहमी  आपले सर्व ऐकून घेणाऱ्या अथवाआपल्या खालच्या दर्जाच्या व्यक्तीवर व्यक्त करत असतो.
उदाहरणच सांगायचे झाल्यास, आपल्या दारात कुत्रे आले तर आपण त्याला रागाच्या भरात दगड मारून पळवून लावतो पण जर वाघ आला तर राग येणे सोडा स्वतःचा जीव मुठीत धरून तिथून निघून जातो.
     स्वामी विवेकानंद म्हणतात, राग येणे म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहणे...
        रागाच्या भरात स्वतःला संपवण्यापेक्षा प्रेमाने, आपुलकीने, आणि हसत जग जिंकता येते का द्वेषाने किंवा सूड भावनेने जग जिंकता येते ....  हे तुम्हिच ठरवा....!!
                                 ©    रोहित जाधव(R.J)
                                            #काव्यप्रवाह

No comments:

Post a Comment