https://poemrj7.blogspot.com
Rohit Jadhav(R.J)
शाळेचा पहिला दिवस...।।
आमच्या शाळेची बेल वाजली
शांत शाळा आता बोलू लागली
सुरु झाल्या सुट्टीतल्या गमती
सगळा परिसर दुमदुमती
डोळे मिटले आता प्रार्थना करू
पसायदान झाले झाला तास सुरु
स्वच्छ भरला होता आमचा वर्ग
नवीन आसन म्हणजे एक स्वर्ग
होता दिवस पहिला शाळेचा
मौज,मजा,मस्ती अन खेळाचा
होत होती घंटा अर्ध्या तासांनी
भूक लागली डब्याच्या वासानी
झाली सुट्टी वेळ जेवणाची
भूक लागली होती केव्हाची
आवडती भाजी गवारीची
मग वाटनी एकमेकांच्या डब्याची
धुतले हाथ डबा केला फस्त
दिवसभर खेळलो बिनदास्त
वेळ झाली शाळा सुटण्याची
इच्छा मनात उद्या भेटण्याची
राजकारण..।।।
रोहित जाधव(R.J)
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे
पक्षा -पक्षांना नसे कोणाचे घेणे देणे
आपलेच नाते वर काढीत नेणे
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे
तुमच्या आमच्या हातात झेंडे देणे
निरागसतेने जाती -जाती चे युद्ध पाहणे
खुर्चीच्या खेळासाठी डाव सारा चाले
सत्तेच्या धुदिंत आम्हा विसरतात साले....
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे
कोटी कोटी च्या पैशावर लोळीत गेले..
आपल्या घरात आमदार खासदार किती झाले?
शेतकऱ्यांच्या जीवावर निवडणूक चाले
गरिबासाठी लढता-लढता स्वतः मोठे झाले
राजकारण म्हणजे जनतेचा मजाक घेणे
अफवांच्या लाटेत स्वतःची राख उधळीत जाणे
मी लिहतो म्हणजे वास्तव सांगत आहे...
तुटलेल्या पंखांना बळ देतो आहे...
मी कणकण जोडीत जातो जे सत्य आहे..
मी लाथाळून देतो जे असत्य आहे..।।।।।।
©रोहित जाधव (R.J)
(काव्यप्रवाह.)
No comments:
Post a Comment