Visit काव्यप्रवाह page on fb. https://poemrj7.blogspot.com. Rohit jadhav(R.J) तुझ्या विना.....
तुझ्या विना न माझे कोणी
अस्तित्व काय एकट्याचे
सारे सुख तुझ्याच पायी
साथ तुझिच मागतो आई
काय आहे माझं एकट्याच
काय कमावलं मी एकट्यान
तुडवून तू काट्याचे फास
जगवले मला तू एकटीने
सहन केला किती तू त्रास
मज साठी केले तू उपवास
जन्म दिला झालो मी धन्य
तुझी सेवा हेच माझे पुण्य
आठवण तुझी येते क्षणोक्षणी
रूप तूझे प्रिय मज चंद्राहुनी
स्वार्थी नाते लोभी दुनिया सारी
मायेच्या दुनियेत तूच जननी खरी
तुझ्या विना जगणे जणू भिकारी
तुझ्या विना प्रेम न देई कोणी
तुझ्या विना आधार कोठे नाही
तुझ्या विना आयुष्य दिव्यांगा वानी
नको देवा मला अन्य काही
राहू दे माझ्या साथ आई
मस्तक माझे तिच्याच ठायी
उपकार तुझे न फिटणारे आई......।।।
रोहित जाधव(R. J)
#काव्यप्रवाह
रोहित जाधव(R. J)
#काव्यप्रवाह
No comments:
Post a Comment